● MPSC Group-C Exam 2026 :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी ही परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदासह गट-क संवर्गातील एकूण 5,707 पदांचा समावेश आहे. परीक्षेच्या सुधारित तारखेसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाने प्रसिद्ध केले आहे. (MPSC Group-C Exam 2026)
● परीक्षेचे नाव : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
● जाहिरात क्रमांक : 017/2026
● एकूण पदसंख्या : 5,707 पदे
● तलाठी पदसंख्या : 1,539 पदे (ग्राम महसूल अधिकारी, गट-क)
● जुनी परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
● नवीन परीक्षा तारीख : 3 जानेवारी 2027
● परीक्षा पद्धत : ऑफलाइन – OMR आधारित
● परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी; तलाठी पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. (मुळ जाहिरात पहा)
● नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
● निवड प्रक्रिया : संयुक्त पूर्व परीक्षा व संबंधित पदासाठी लागू असलेल्या पुढील निवड प्रक्रियेनुसार
MPSC Group-C Exam Date : तलाठीसह गट-क परीक्षेची तारीख बदलली
| अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची तारीख 25 ऑक्टोबर 2026 वरून 3 जानेवारी 2027 अशी बदलण्यात आली आहे.
- परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.
- या परीक्षेत तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी पदाचाही समावेश करण्यात आला आहे.
- तलाठी पदासाठी 1,539 जागा असून गट-क परीक्षेतील एकूण पदसंख्या 5,707 आहे.
- सुधारित परीक्षा ऑफलाइन OMR पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- परीक्षा पुढे ढकलताना विविध जिल्ह्यांतील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि उमेदवारांना सुरक्षितपणे परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या बाबींचा विचार करण्यात आला आहे.
- राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026, इतर भरती परीक्षांचे वेळापत्रक आणि राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन यांचाही नियोजनात विचार करण्यात आला आहे.
- परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ, प्रवेशपत्र आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येतील.
- उमेदवारांनी नवीन परीक्षा तारखेनुसार आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे.
- अर्ज केलेल्या उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सूचना तपासाव्यात.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी MPSC चे अधिकृत शुद्धीपत्रक व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
12वी पास उमेदवारांसाठी 2536 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! भरती परीक्षा पद्धतीत 10 मोठे बदल होणार
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 376 जागांसाठी भरती
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 जागांसाठी भरती
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 147 जागांसाठी भरती
राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 94 जागांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 545 जागांसाठी भरती
महाराष्ट्रात 30,209 शिक्षक पदांसाठी मेगा भरती सुरू



