SBI PO Admit Card 2026 :
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती 2026 च्या प्राथमिक (Preliminary) परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Prelims Call Letter) जारी केले आहे. अर्ज केलेले उमेदवार आता SBI च्या अधिकृत करिअर पोर्टलवरून किंवा लॉगिन पोर्टलवर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
यंदा SBI मार्फत 1,500 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्राथमिक परीक्षा ऑगस्ट 2026 मध्ये होणार असून प्रवेशपत्रावर उमेदवाराचा परीक्षा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता तसेच महत्त्वाच्या परीक्षा सूचना नमूद करण्यात आल्या आहेत.
प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल? (SBI PO Admit Card)
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
- SBI च्या अधिकृत करिअर पोर्टलला भेट द्या.
- Recruitment of Probationary Officers (PO) 2026-27 या विभागातील Download Online Preliminary Exam Call Letter या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख (Date of Birth) टाकून लॉगिन करा.
- स्क्रीनवर दिसणारे प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा.
प्रवेशपत्रावरील तपशील तपासा
उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील नाव, रोल नंबर, परीक्षा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्र, छायाचित्र आणि स्वाक्षरी यासह सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी. कोणतीही त्रुटी आढळल्यास तातडीने SBI च्या भरती विभागाशी संपर्क साधावा.
परीक्षा दिवशी काय आवश्यक?
परीक्षा केंद्रावर जाताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.
- प्रवेशपत्राची छापील प्रत
- वैध फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
- प्रवेशपत्रात नमूद केलेल्या इतर आवश्यक सूचनांचे पालन
उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा सल्ला SBI ने दिला आहे.
निवड प्रक्रिया
SBI PO भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. प्रथम Preliminary Examination, त्यानंतर Main Examination आणि शेवटी Psychometric Test, Group Exercise आणि Interview या टप्प्यांद्वारे अंतिम निवड केली जाईल.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी मेगाभरती
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 148 जागांसाठी भरती
IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांच्या 6715 जागांसाठी भरती
भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 119 जागांसाठी भरती
इंडियन ओव्हरसीज बँकेत अप्रेंटिस पदाच्या 750 जागांसाठी भरती



