MPSC Exam : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! भरती परीक्षा पद्धतीत 10 मोठे बदल होणार

MPSC Exam : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! भरती परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार MPSC Major changes ahead for the recruitment exam process
शेअर करा

MPSC Exam : भरती परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार

महाराष्ट्रातील सरकारी भरती परीक्षांच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यात आवश्यक सुधारणा सुचविण्याचे काम या समितीकडून केले जाणार आहे. (MPSC Exam)

या पार्श्वभूमीवर 12 सप्टेंबर 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांशी आणि परीक्षार्थींशी थेट संवाद साधला जाणार आहे. हे सल्लामसलत होणार असून, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक तसेच इतर संबंधित घटकांना आपल्या सूचना व अनुभव मांडता येणार आहेत.

MPSC Exam मध्ये नेमके कोणते बदल अपेक्षित?

सरकारने केवळ परीक्षा घेण्याच्या पद्धतीपुरता हा आढावा मर्यादित ठेवलेला नाही. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्र व्यवस्थापन आणि तक्रार निवारणापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला जाणार आहे.

यामध्ये विशेषतः पुढील बाबींवर सूचना मागविण्यात आल्या आहेत :

  • प्रश्नपत्रिका तयार करणे व तिची गोपनीयता
  • प्रश्नपत्रिकेची छपाई, वाहतूक व वितरण व्यवस्था
  • परीक्षा केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था
  • उमेदवारांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण
  • परीक्षा केंद्रांवरील CCTV देखरेख
  • तांत्रिक अडचणी आणि ऑनलाइन परीक्षा व्यवस्था
  • गैरप्रकार व पेपरफुटी रोखण्यासाठी उपाययोजना
  • तक्रार निवारणाची प्रभावी व्यवस्था
  • परीक्षार्थ्यांसाठी अधिक सुलभ व उमेदवाराभिमुख प्रक्रिया
  • इतर राज्यांमधील यशस्वी परीक्षा पद्धतींचा अभ्यास

समिती या सर्व बाबींवर विद्यार्थी व संबंधित घटकांकडून मिळणाऱ्या सूचनांचा अभ्यास करून शासनाला सुधारणा सुचवणार आहे.

● 10 सप्टेंबरपर्यंत सूचना देण्याची संधी

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, परीक्षार्थी आणि इतर संबंधितांना 7 ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीत आपले अभिप्राय, हरकती आणि सूचना सादर करता येणार आहेत. यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्यांना ई-मेलद्वारेही आपले म्हणणे पाठवता येणार आहे.

● 12 सप्टेंबरला पुण्यात थेट संवाद

दिनांक : 12 सप्टेंबर 2026
वेळ : सकाळी 10.30 वाजता
ठिकाण : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

या बैठकीत विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत आलेल्या अडचणी, तांत्रिक समस्या, गैरप्रकारांबाबतचे अनुभव आणि भविष्यात कोणते बदल अपेक्षित आहेत, याबाबत थेट सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.

● MPSC विद्यार्थ्यांसाठी का महत्त्वाचे?

अलीकडील काळात विविध भरती परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटणे, तांत्रिक अडचणी आणि परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे उमेदवारांमध्ये असंतोष दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने परीक्षा व्यवस्थेचा केवळ एखाद्या परीक्षेपुरता नव्हे, तर संपूर्ण प्रणालीचा आढावा घेण्याची भूमिका घेतली आहे. (MPSC Exam)

विद्यार्थी संघटनांकडूनही समितीच्या स्थापनेचे स्वागत करण्यात आले असले तरी, फक्त समिती स्थापन न करता विद्यार्थ्यांच्या सूचनांवर वेळबद्ध पद्धतीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

● राज्यभर होणार संवाद

ही प्रक्रिया केवळ पुण्यापुरती मर्यादित राहणार नाही. उच्चस्तरीय समिती राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित घटकांशी संवाद साधणार आहे. विविध विभागांतून प्राप्त होणाऱ्या सूचनांचा अभ्यास करून भरती परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा सुचविण्यात येणार आहेत.

त्यामुळे (MPSC Exam) आणि इतर सरकारी भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 12 सप्टेंबरची पुण्यातील बैठक महत्त्वाची ठरणार आहे. परीक्षा प्रक्रियेत प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी आणि अपेक्षित सुधारणा शासनापर्यंत पोहोचवण्याची ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.


भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 94 जागांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 545 जागांसाठी भरती

महाराष्ट्रात 30,209 शिक्षक पदांसाठी मेगा भरती सुरू

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 1538 जागांसाठी भरती

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदाच्या 289 जागांसाठी भरती

कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती

IBPS Clerk : IBPS मार्फत लिपिक पदाच्या 11,403 जागांसाठी भरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 120 जागांसाठी भरती


Scroll to Top