Teacher Recruitment 2026 :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदांच्या तब्बल 30,209 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पवित्र (Pavitra) पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्ताधारित पद्धतीने केली जात असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) ही 27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत ऑनलाईन घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले असून 1,70,108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पदांचा तपशील (Teacher Recruitment)
भरती प्रक्रियेनुसार विविध विभागांकडून खालीलप्रमाणे रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे:
- जिल्हा परिषद – 13,351 पदे
- महानगरपालिका – 1,954 पदे
- नगर परिषद / नगर पालिका – 280 पदे
- खाजगी शैक्षणिक संस्था – 12,148 पदे
- आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा – 2,421 पदे
- शासकीय विद्यानिकेतन – 56 पदे
एकूण रिक्त पदे : 30,209
यापैकी 19,881 पदे मुलाखतीशिवाय, तर 10,328 पदे मुलाखतीसह भरली जाणार आहेत.
इयत्तानिहाय पदसंख्या
- इयत्ता 1 ली ते 5 वी – 14,320 पदे
- इयत्ता 6 वी ते 8 वी – 10,012 पदे
- इयत्ता 9 वी ते 10 वी – 5,513 पदे
- इयत्ता 11 वी व 12 वी – 364 पदे
11 ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करणे आवश्यक
भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पदनिहाय पसंतीक्रम (Preference Order) निश्चित करण्याची सुविधा 6 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उमेदवारांनी 11 ऑगस्ट 2026 पर्यंत आपला पसंतीक्रम नोंदवून लॉक करणे बंधनकारक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांसाठी गुणवत्तायादी (Merit List) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तक्रार किंवा सूचना कुठे पाठवायची?
भरती प्रक्रियेसंदर्भातील सूचना, मागण्या किंवा तक्रारी उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन शालेय शिक्षण आयुक्तांनी केले आहे.
भरती संदर्भातील अधिक माहिती वाचा :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदाच्या 289 जागांसाठी भरती
कोकण रेल्वेत विविध पदांच्या 201 जागांसाठी भरती
IBPS Clerk : IBPS मार्फत लिपिक पदाच्या 11,403 जागांसाठी भरती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 120 जागांसाठी भरती
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये 54 विविध पदांसाठी भरती
तलाठी पदाच्या 1539 जागांसाठी भरती
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 395 विविध पदांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-कच्या 5707 पदांसाठी मेगा भरती
पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 6777 जागांसाठी मेगाभरती



